Install Fonts


फाँट्स इंस्टॉल कसे करावेत ?

पहील्यांदा फाँट्स असलेला फोल्डर संगणकावर कॉपी करुन घ्यावा.
त्यानंतर 
  • Start > settings > control panel येथे जावे.
  • फाँट्स (Fonts) असे लिहिलेला फोल्डर दीसेल. तो उघडावा.
या फोल्डरमध्ये तुम्ही सध्या वापरत असलेले सर्व फाँट्स फाइल दीसतील.
  • फोल्डरमध्ये वरच्या बाजुला File असे लिहिलेला टॅब असेल तो सीलेक्ट करा.( Alt बटण दाबल्यास आपोआप File टॅब सीलेक्ट होतो. आठवा आपले कीबोर्ड शॉर्टकट्स!)
  • File > install new fonts असा पर्याय दीसेल. तो नीवडावा.
  • खाली दाखवील्या प्रमाणे जीथे फाँट्सचे फोल्डर सेव्ह(Save) केले आहे ती जागा निवडावी.
  • त्यानंतर वरील चित्रात दाखवीलेले Select all आणि OK हे बटण दाबावे.
हे नविन फाँट्स भराभर इन्स्टॉल होतील आणि लगेचच तुम्ही ते वापरुही शकता.